Home Breaking News ट्रकचालकांचा संप, कोळसा वाहतुक प्रभावीत

ट्रकचालकांचा संप, कोळसा वाहतुक प्रभावीत

● तीन दिवसीय संपामुळे वेकोलीला फटका ● नववर्षाच्‍या प्रथमदिनी वाहनचालक रस्‍त्‍यावर

1562
C1 20240101 16155914
तीन दिवसीय संपामुळे वेकोलीला फटका
नववर्षाच्‍या प्रथमदिनी वाहनचालक रस्‍त्‍यावर

Truck Driver Strike Wani :  वणी उपविभागात मोठया प्रमाणात वाहतुक कंपन्‍या कार्यरत आहेत. त्‍यातील हजारो ट्रकचालक नववर्षाच्‍या प्रथमदिनी रस्‍त्‍यावर उतरल्‍याने कोळसा वाहतुक प्रभावीत झाली आहे. तीन दिवसीय संपामुळे वेकोलीला प्रचंड फटका बसणार असुन केंद्र सरकारने आणलेला नवा मोटार वाहन कायदा रद्द करवा ही मागणी रेटून धरण्‍यात आली आहे. WCL will be hit hard due to the three-day strike..!

केंद्र शासनाने नविन मोटार वाहन कायदा आणला आहे. या कायद्याला (New Motor Vehicle Act) संपुर्ण देशात प्रचंड विरोध होतोय. वणी उपविभागात सुध्‍दा मोठया प्रमाणात असणाऱ्या वाहतुक कंपन्‍यातील ट्रकचालकांनी या संपात सहभाग नोंदवला आहे. यामुळे सर्वाधीक नुकसान वेकोली प्रशासनाचे होणार आहे. हजारो टन कोळसा वाहतुक ठप्‍प पडल्‍याने पॉवर प्‍लान्‍टला कोळशाची आपूर्ती होणार नाही यामुळे राज्‍यभरात विज पुरवठा विस्‍कळीत होण्‍याची चिन्‍हे निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून, ट्रकचालक थेट रस्त्यावर उतरले आहेत. होणाऱ्या संभाव्‍य अपघाताला ट्रकचालकच जबाबदार असणार का ? असा प्रश्‍न या निमीत्‍ताने उपस्थित होत आहे. यामुळे ट्रक चालकांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

अपघातानंतर त्‍या स्थळावर थांबल्यावर चूक नसतांना देखील स्थानिक नागरिक ट्रकचालकाला मारहाण करतात. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी ट्रकचालक पळून जातात.  अत्‍यल्‍प वेतनावर काम करणारे ट्रक चालक घसघसीत दंड कसा भरु शकेल असेही ट्रकचालकांनी स्‍पष्‍ट केले असुन केंद्र शासनाने केलेल्‍या कायद्यात वाहन चालक खास करून ट्रक चालकांविरोधात एकतर्फी कारवाईची तरतूद करण्यात आली असल्याचा आरोप करण्‍यात येत आहे. तो नवीनतम कायदाच रद्द करावा अशी मागणी ट्रकचालकांकडून करण्‍यात येत आहे.

पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवणार
केंद्र सरकारने आणलेला नवा मोटार वाहन कायदा रद्द करवा, या मागणीसाठी बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांच्या पेट्रोल-डिझेल टँकरचालकांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे.  यामुळे राज्‍यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवणार आहे तसेच वेकोलीतील कोळसा वाहतुक ठप्‍प झाल्‍यामुळे विजपुरवठा सुध्‍दा विस्‍कळीत होणार असल्‍याचे चिन्‍हे दिसत आहे.
Rokhthok news