Home क्राईम LCB पथक ‘अलर्ट’, तीन दिवसात दोन कारवाया

LCB पथक ‘अलर्ट’, तीन दिवसात दोन कारवाया

933

प्रतिबंधित तंबाखू व अवैध धंदे ‘टार्गेट’

रोखठोक | जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले. यामुळेच नव्याने स्थापित वणीतील LCB पथक अलर्ट झाले असून प्रतिबंधित तंबाखू व अवैध धंदे ‘टार्गेट’ असल्याने तीन दिवसात दोन कारवाया करण्यात आल्या.

वणी उप विभागात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची मोठया प्रमाणात आयात नागपूर, अदीलाबाद व अन्य ठिकाणावरून केली जाते. राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची मागणी प्रचंड असल्याने नवनवीन तंबाखू तस्कर उदयास येत आहे. या धंद्यातील मोठे मासे मात्र पोलिसांच्या गळाला का लागत नाही हा संशोधनाचा विषय आहे. महादेव नगरी प्रतिबंधित तंबाखू प्रकरणातील तीन अज्ञात आरोपी अद्याप मोकाट आहेत.

LCB पथकाची कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेच्या वणी येथील पथकाने प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व गुटख्यावर तीन दिवसात दोन कारवाया केल्या आहेत. यात 10 लाख 25 हजर 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. 27 जानेवारीला साने गुरुजी नगर फाले लेआउट परिसरात कारवाई करून मुनाल उर्फ मुन्ना नवनाथ बेलेकर (34) याला ताब्यात घेत प्रतिबंधित तंबाखू व दुचाकी जप्त करण्यात आली.

सोमवार दि. 30 जानेवारीला मध्यरात्री प्राप्त माहितीच्या आधारे लालपुलिया परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. यावेळी सिल्वर रंगाची हुंडाई कंपनीची वरणा कार क्रमांक MH- 34-AA- 7766 या वाहनांची झाडाझडती घेतली असता प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. वाहनचालक अब्दुल नदीम अब्दुल मोबीन (30) रा. साई नगरी याला ताब्यात घेत गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, LCB PI प्रदीप परदेशी यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोउपनि योगेश रंधे, उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधीर पिदुरकर, सुधीर पांडे, सतिष फुके, नरेश राउत यांनी पार पाडली.
वणी: बातमीदार