Home Breaking News शिवपुराणला महाकथेला राजकीय पुढाऱ्यांची हजेरी

शिवपुराणला महाकथेला राजकीय पुढाऱ्यांची हजेरी

● अहिर, राठोड, ठाकरे यांचे नंतर मुनगंटीवार

1952
C1 20240201 19133047

अहिर, राठोड, ठाकरे यांचे नंतर मुनगंटीवार

Wani News : श्री शिवमहापुराण महाकथेला चांगलाच प्रतिसाद मिळतोय, दिवसेदिवस अलोट गर्दी वाढतांना दिसत आहे. गुरुवारी गर्दीने आपला उच्‍चांक मोडला आहे तर शेवटच्‍या दिवशी शुक्रवारी रेकॉर्डब्रेक भाविकांची मांदियाळी असेल असे वर्तवण्‍यात येत आहे. तसेच हंसराज अहिर, संजय राठोड, शर्मिला राज ठाकरे यांनी आतापर्यंत हजेरी लावली असुन शुक्रवारी वनमंञी सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.Sri Shiva Mahapuran epic is getting good response, day by day lot of crowd is increasing.

 श्री शिवपुराण महाकथेचे  प्रमुख आयोजक राजकुमार जयस्वाल व श्रद्धा राजकुमार जयस्वाल यांनी वणी शहरालगत असलेल्या पळसोनी येथे सुप्रसिद्ध कथा वाचक प्रदिप मिश्रा यांचे महाकथेचे भव्यदिव्य आयोजन दिनांक 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत केले आहे. या महाकथेसाठी भारतातील अनेक राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. या महाकथेला अनेक मान्यवर नेत्यांनी, भेट देत महाकथेचा आस्‍वाद घेतला आहे.

Img 20240201 Wa0024

परसोडा येथे सुरु असलेल्या शिवपुराण कथेला दररोज लाखो भाविकांची गर्दी असते. दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान प्रदिप मिश्रा यांच्या सुश्राव्‍य कथा वाचनाचा लाभ भाविक भक्‍त घेतांना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी 3 वाजता शर्मिला राज ठाकरे व मनसेच्‍या राज्य सरचिटणीस रिटा गुप्ता यांचे कथास्‍थळी आगमन झाले तर शर्मिला ठाकरे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करत आरती सुध्‍दा केली.

शिवपुराण महाकथेला माजी केंद्रीय गृह राज्‍यमंञी हंसराज अहिर यांनी उपस्थिती दर्शवली आहे तर पालकमंञी संजय राठोड यांनी सुध्‍दा हजेरी लावली आहे. आयोजित महाकथेला दररोज आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसे नेते राजु उबंरकर सपत्‍नीक उपस्थित असतात. शेवटच्‍या दिवशी सकाळी 9 वाजता वन मंञी सुधीर मुनगंटटीवार प्रामुख्‍याने उपस्थित राहणार असुन चंद्रपुर – आर्णी लोकसभा विस्‍तारक रवी बेलुरकर यांनी त्‍यांना आमंञीत केले आहे.
Rokhthok News