Home Breaking News खळबळ….मृतावस्थेत आढळले वाघाचे पिल्लू

खळबळ….मृतावस्थेत आढळले वाघाचे पिल्लू

● सुकनेगाव येथील घटना

2172
C1 20240201 07482675

सुकनेगाव येथील घटना

Wani News : तालुक्‍यातील सुकनेगाव शिवारात असलेल्‍या तलावाजवळ दि. 31 जानेवारी रोजी वाघाचे पिल्‍लु मृतावस्‍थेत आढळले. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. The tiger cub was found dead.

तालुक्‍यात कोळसा खाणी तसेच जंगल परीसरात वाघाचा वावर असल्‍याचे यापुर्वी स्‍पष्‍ट झाले आहे. शेतकरी वाघाच्‍या दहशतीत वावरत असल्‍याचे नाकारता येत नाही. यापुर्वी वाघाने जनावर तसेच शेतमजुरावर हल्‍ला चढविल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहे.

घटनेच्या दिवशी सुकनेगाव येथील तलावाजवळ आई पासुन विभक्‍त झोलेले तीन महीन्‍याचे वाघाचे पिल्‍लु नागरीकांना मृतावस्‍थेत आढळुन आले. याघटनेने सुकनेगाव परीसरात चांगलीच खळबळ उडाली. घटनेची माहीती नागरीकांनी वनविभागाला दिली.

वन‍परीक्षेत्रीय अधिकारी प्रभाकर सोनडवले यांनी पथकासह तातडीने घटनास्‍थळ गाठले. त्‍यावेळी सुकनेगाव बिटमध्‍ये महसुल विभागाच्‍या कक्ष क्रंमाक 6 पासुन 20 ते 30 मीटर अंतरावरील तलावाजवळ वाघाचे पिल्‍लु मृतावस्‍थेत पडलेले होते.

सुकनेगाव परीसरात मागील काही दिवसांपासुन एका वाघीनीचा संचार असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. त्‍या वाघीनीपासुन पिल्‍लु विभक्‍त झाले आणि त्‍याचा भुकबळीमुळे मृत्‍यु झाल्‍याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. घटनास्‍थळाचा पंचनामा केल्‍यानंतर मंदर येथील निलगीरी वनात वाघाच्‍या मृत पिलावर अत्‍यंसंस्‍कार करण्‍यात आले आहे.
Rokhthok News