Home वणी परिसर वणीत जैताई नवरात्रारंभ सुश्राव्य गायनाने

वणीत जैताई नवरात्रारंभ सुश्राव्य गायनाने

184
C1 20240404 14205351

वणी: जैताई चैत्र नवरात्राचा शुभारंभ सुश्राव्य गायनाच्या कार्यक्रमाने होत आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला वर्धा येथील सुप्रसिध्द गायिका खुशबु कठाणे यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित आहे.

कार्यक्रम रात्री 7:30 वाजता मंदिराच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या बहारदार कार्यक्रमाची वाद्यसंगत जीवन बांगडे (वर्धा) आणि अजित खंडारे (वणी) अनुक्रमे तबला व संवादिनीची साथ देऊन करणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन श्री जैताई देवस्थान व श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. गुढीपाडव्याच्याच दिवशी सकाळी येथील ग्रामीण रुग्णालयाला जैताई अन्नछत्र समितीच्या वतीने एक कुलर भेट देण्यात येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गत वर्षीच्या उन्हाळ्यात ग्रामीण रुग्णालयाला जैताई अन्नछत्र समितीने तीन कुलर भेट दिले होते हे विशेष.
वणी: बातमीदार