Home वणी परिसर Breaking news… वणीत 320 किलो गोमांस जप्त

Breaking news… वणीत 320 किलो गोमांस जप्त

1992

डी बी पथकाची कारवाई, 4 आरोपी जाळ्यात

वणी बातमीदार: शहरातील रजा नगर व मोमीनपुरा येथे गोमांस ची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच डी बी पथकाने रविवारी सकाळी धाडसत्र अवलंबले. यावेळी 4 आरोपीला ताब्यात घेत दोन्ही ठिकाणावरून तब्बल 320 किलो गोमांस जप्त करण्यात आले.

राज्यात गोमांस विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. त्या प्रमाणेच गोवंश तस्करी चे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करीत आहे. मात्र लपूनछपून गोवंशाची कत्तल केली जाते. राहत्या घरातच गोवंशाची कत्तल करून गोमांस विकत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शोध पथकाला दिले.

रजा नगर व मोमीनपुरा येथे धाडसत्र अवलंबण्यात आले असता दोन्ही ठिकाणी 320 किलो गोमांस आढळून आले. यावेळी मोमीनपुरा येथून मो. नासिर अब्दुल रशीद (51), मो. कैसर अब्दुल अजीज कुरेशी (45) तर रजा नगर येथील इस्तक अब्दुल वाहब कुरेशी (48), मो. जुबेर अब्दुल मूनाफ (32) याना अटक करण्यात आली असून गोमांस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव यांच्या नेतृत्वात डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक आशिष झिमटे, सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, संतोष आढाव, संजय शेंद्रे यांनी केली.