Home Breaking News पालीकेचे अधिकारी अडकले ACB च्‍या जाळयात..!

पालीकेचे अधिकारी अडकले ACB च्‍या जाळयात..!

● कंञाटदाराला लाच मागणे भोवले

2173
C1 20240404 14205351

कंञाटदाराला लाच मागणे भोवले

Wani News | वणी शहरातील नगर पालीका रामभरोसे झाली आहे. कर्मचारी व अधिकारी सैराट झाल्‍याचे चिञ बघायला मिळते. कायमस्‍वरुपी मुख्‍याधिकारी नसल्‍याने प्रचंड अनागोंदी माजली आहे. त्‍यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या यवतमाळ येथील पथकाने मंगळवार दिनांक 1 ऑगष्‍टला दुपारी सापळा रचला असता पालिकेचे अधिकारी जाळयात अडकलेत. त्‍यांची भालर येथील विश्रामगृहात चौकशी सुरु आहे. The raid was made by the Yavatmal team of Anti-Corruption Department

कंञाटदाराला केलेल्‍या कामाचे देयक काढण्‍यासाठी त्‍या अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली होती. याबाबत ञस्‍त झालेल्‍या कंञाटदाराने लाचलुचवत विभागाकडे रितसर तक्रार केली होती. पथकाने यासर्व प्रकरणाची पडताळणी केली आणि यवतमाळ मार्गावरील खरेदी विक्री संघाच्‍या कार्यालयाच्‍या वर असलेल्‍या भोजनालयात कारवाई करण्‍यात आली.

याप्रकरणी विस्‍तृत माहिती प्राप्‍त होवू शकली नाही माञ अभियंता व आरोग्‍य निरिक्षक असल्‍याची चर्चा जोर धरत आहे. कंञाटदाराला नेमकी किती रुपयांची लाच मागीतली हे चौकशीअंती स्‍पष्‍ट होणार असुन पालीकेतील अनागोंदी चव्‍हाटयावर आली आहे.
Rokhthok News