Home वणी परिसर सुकनेगाव शिवारात वाघाचा बैलावर हल्ला

सुकनेगाव शिवारात वाघाचा बैलावर हल्ला

156
C1 20240404 14205351

*शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण

वणी:- तालुक्यातील सुकनेगाव शेत शिवारात शेतात चरत असलेल्या बैलावर वाघाने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना दि 1 सप्टेंबर ला दुपारी 2 वाजताचे सुमारास घडली.

वणी परिसरातील काही भागात वाघाचा वावर असल्याचे सिध्द झाले आहे. यापूर्वी अनेक जनावरांवर वाघाने हल्ला चढवून ठार केले आहे. वाघाचे लोकेशन मिळावे याकरिता वनविभागाने जंगलात ठीक ठिकाणी कॅमेरे लावून वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवित आहे.

दोन महिन्या पूर्वी झरी तालुक्यात एका मुलावर वाघाने हल्ला चढवून ठार केले होते त्यावेळी गावकऱ्यांच्या मागणी वरून वाघाला वन विभागाने जेरबंद केले होते. आता पुन्हा वाघाचा वाढता वावर शेतकऱ्यानं साठी डोकेदुखी ठरत आहे.

रासा या गावातील शेतकरी गजानन रामकृष्ण धांडे यांचे सुकनेगाव शिवारात असलेल्या शेतात बैल चारण्यासाठी नेले होते. दुपारी 2 वाजताचे सुमारास दडून बसलेल्या वाघाने बैलावर हल्ला चढवला ही बाब शेतातील मजुरांच्या लक्षात येताच आरडाओरड केल्याने बैलाला जखमी करून वाघाने जंगलाकडे धूम ठोकली.

सध्या शेतीचे कामे सुरू असल्याने शेतकरी व शेतमजूर शेतात कामे करीत असतात त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून  वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.