Home Breaking News आयशरला दुचाकी भिडली, तरुण गंभीर

आयशरला दुचाकी भिडली, तरुण गंभीर

● कायर जवळ घडली घटना

2263
C1 20240404 14205351

कायर जवळ घडली घटना

Accident News : भरधाव दुचाकी चालवण्याचे फॅड तरुणात दिसून येत आहे. कायरला खर्रा आणायला गेलेल्या 30 वर्षीय तरुणाची दुचाकी थेट उभ्या असलेल्या आयशर वाहनावर धडकली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून प्रत्यक्षदर्शींनी त्याला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. He was shifted to rural hospital but as his condition is serious, he has been shifted to Chandrapur for further treatment.

नितेश अरुण ढोके (26) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो डोंगरगाव ( कोसारा) येथील निवासी होता. खर्रा खाण्याची तलफ बळावल्याने त्याने मित्राची पॅशन दुचाकी क्रमांक MH-29-BX-1893 मागितली आणि कायर ला गेला. परतीच्या वाटेवर असताना कायर जवळील वळणावर दुचाकी उभ्या आयशर ट्रकला धडकली.

अपघात भीषण होता, स्थानिक नागरिकांनी जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवले. आणि घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळावर पोहचले असून जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Rokhthok News