Home Breaking News फडणवीस विरोधात ‘वंचित’ ची घोषणाबाजी

फडणवीस विरोधात ‘वंचित’ ची घोषणाबाजी

1144

घोषणा देणारे पोलिसांच्या ताब्यात

वणी:

पालिकेने नव्यानेच उद्यानाचे निर्माण केले आहे, त्याचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी होत आहे. तत्पूर्वी वंचीत बहुजन आघाडी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “गो बॅक” च्या घोषणा दिल्या.

वणी नगर पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शहरात बाजीचा तयार केला आहे. त्या बगीच्याचा लोकपर्ण सोहळा आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याने फडणवीस आज वणी शहरात येणार आहे. भाजपच्या वतीने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी देखील केली आहे.

मात्र फडणवीस यांचे आगमन होण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने येथील टिळक चौकात फडणवीस व भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली. फडणवीस गो बॅक, जनगणनेत ओबीसी चा कॉलम नाकारणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, मिलिंद पाटील, मंगल तेलंग सह 7 ते 8 कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे