Home Breaking News त्या…प्रकरणातील आरोपीला 6 महिन्याची शिक्षा

त्या…प्रकरणातील आरोपीला 6 महिन्याची शिक्षा

1263
C1 20240404 14205351

प्रथम श्रेणी न्यायालयाचा निर्णय

रोखठोक |:– दुचाकीच्या चोरी प्रकरणात न्यायालयाने चोरट्याला ला दोषी ठरवले आहे. या प्रकरणी न्यायाधीश एस. एम. बोमीडवार यांनी आरोपीला 6 महिने सक्त मजुरी व 1000 रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

वणी शहरात व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. दुचाकी चोरीत पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करून ASI प्रभाकर कांबळे यांनी तपास सुरू केला होता.

राळेगाव तालुक्यातील सावनेर येथील दशरथ विठ्ठल अंजिकर (22) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचेवर भादवि कलम 379 नुसार गुन्हा नोंद करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. दि 30 नोव्हेंबर ला येथील प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायधीश एस. एम. बोमीडवार यांनी आरोपीला दोषी ठरवत 6 महिने सक्त मजुरीची व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावास भोगावा लागणार आहे. सरकार तर्फे ऍड प्रवीण कन्नलवार यांनी काम पाहिले
वणी: बातमीदार