Home क्राईम Crime News : कोंबड बाजार, सहा ताब्यात

Crime News : कोंबड बाजार, सहा ताब्यात

● साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त ● शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

1884
C1 20231201 18292391

साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Wani News | शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदोला शिवारात जंगी कोंबड बाजार सुरू होता. प्राप्त माहितीच्या आधारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकली असता सहा जुगाऱ्याना ताब्यात घेत तीन लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Three lakh 44 thousand rupees worth of goods were seized after arresting six gamblers.

अंकुश कवडू गोहकर, विलास महादेव मरसकोल्हे, सुरेश बाबाराव वाबेटकर, गुजरात भास्कर थेरे, विनोद हरिदास येडे, अजित रमेश दुबे असे अटकेतील जुगाऱ्यांची नवे आहे. उपविभागात कोंबड बाजाराला चांगलाच उत आला आहे. मात्र मुकूटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोंसा शिवारात खुलेआम चालणारा कोंबड बाजार पोलिसांना दिसेनासा झाला आहे.

शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने लपूनछपून चालणाऱ्या कोंबड बाजारावर कारवाया करण्यात येत आहे. उपविभागात कोंबड बाजाराला उत आला आहे लपून छपुन आंबट शौकीन आपले मनसुबे पूर्णत्वास नेताना दिसत आहे. जंगल असलेल्या भागात पैशाला डाव लावून कोंबड्याची झुंज लावल्या जात आहे. काही ठिकाणी बिनधास्त सुरू असलेला कोंबड बाजार पोलीस प्रशासनाला दिसत नाही किंबहुना दिसत नसल्याचे ढोंग करताहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उप विभागात LCB ( स्थानिक गुन्हे शाखा ) यांचा बऱ्यापैकी दरारा आहे. अवैद्य व्यवसायावर कारवाई करण्याचा सपाटा सुरू आहे परंतु काही ठिकाणी उप विभागात उघडपणे चालणारे कोंबड बाजार त्यांच्या दृष्टीपथास पडू नये हीच खरी शोकांतिका आहे.

शिंदोला शेत शिवारात कळमना रस्त्या जवळ कोंबड्याची झुंज लावून जुगार खेळल्या जात असल्याची माहिती ठाणेदार राठोड यांना मिळाली. त्यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळ गाठून धाड टाकली. याप्रसंगी तीन जिवंत कोंबडे, सहा दुचाकी व नगदी असा 3 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, sdpo गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संजय राठोड, psi राम कांदुरे, सुनील दुबे, प्रशांत झोड, निलेश भुसे, गुणवंत पाटील यांनी केली.
Rokhthok News