Home Breaking News त्या…कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटली

त्या…कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटली

1906

शिरपूर पोलिसांची कामगिरी

रोखठोक | मावळत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी सडलेला व कुजलेल्या अवस्थेतील स्त्री जातीचा मृतदेह वर्धा नदी पात्रातील शिवनी शिवारात आढळला. शिरपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास आरंभला. ओळख पटवणे कठीण असताना एकएक कडी जुळवत मृतकाची ओळख पटवली.

चिनक्का राजण्णा नायकप असे मृत महिलेचे नाव आहे. ती घुग्गुस पोलीस स्टेशन हद्दीतील शिवनगर येथील निवासी आहे. वर्धा नदी पत्रात अनोळखी मृतदेह असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गुन्हा नोंदवला.

मृतक महिला नेमकी कोणत्या गावाची हे कळायला मार्ग नव्हता. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस, गडचांदूर ह्या लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीत मयत महिलेचा फोटो दाखवून चौकशी करण्यात आली. ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक गजानन सावसाकळे यांनी लगतचे खेडेपाडे पिंजून काढले.

मृतक महिलेला गलगंड झालेला होता, हाच धागा पकडून मिळेल त्यांना विचारणा करण्यात येत होती. शिवनगर येथील महिला बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळले. मृतकाचा मुलगा लक्ष्मण नायकप ची भेट घेण्यात आली. त्याने आई चा मृतदेह ओळखला. गलगंड फुटल्याने तिला खूप त्रास होत होता यामुळेच तिने आत्महत्या केली असावी असा कयास वर्तवण्यात येत आहे.
वणी: बातमीदार

Previous articleविजय चांदेकर ठरला विदर्भ आयडॉल
Next articleबंद घर निशाण्यावर, रोकड व ऐवज लंपास
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.