Home Breaking News बाजारात मुञीघरांची गरज, होतं ते सुध्दा केले बंद

बाजारात मुञीघरांची गरज, होतं ते सुध्दा केले बंद

442

युवासेनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन

रोखठोकः शहरातील गजबजलेल्‍या बाजारपेठेतील मुञीघरच अचानक पालीका प्रशासनाने बंद केल्‍याने व्‍यवसायीक तसेच ग्राहक यांची कुचंबणा होत आहे. तरी तडकाफडकी बंद करण्‍यात आलेले मुञीघर सुरु करावे अशी मागणी युवासेनेचे उपजिल्‍हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी मुख्‍याधिकारी यांना दिलेल्‍या निवेदनातुन केली आहे.

वणी शहरात अनेक गावांतील महिला पुरुष बाजारानिमीत्‍य येतात. शहरातील वर्दळीच्‍या ठिकाणी प्रसाधन गृह असणे गरजेचे आहे. शहरात टिळक चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, टूटी कमान, भाजी मंडी आदी गजबजलेल्‍या ठिकाणी महिलां व पुरूषाकरीता प्रसाधन गृहांची नितांत आवश्‍यकता आहे.

मुख्य बाजारपेठेत जवळपास 40 ते 50 वर्षापासुन सुरू असलेले पुरुष मुत्रीघर गेल्या महिनाभरापासून कोणतीही पुर्वसुचना न देता नगर परिषदेकडून बंद करण्यात आले आहे. त्‍या मुञीघराला कुलूपबंद करण्‍यात आले असुन आरोग्य विभागाच्या मागे असलेले मुत्रीघर वापरण्यात यावे अशी सुचना लिहण्‍यात आली आहे. यामुळे जुन्‍या मुञीघरा लगतच्‍या व्‍यवसायीकांची व ग्राहकांची चांगलीच गोची झाली आहे.

पालीकेने दुर्गंधी येत असल्‍याचे कारण पुढे करुन ते मुञीघर बंद केल्‍याचे बोलल्‍या जात असुन मुञीघरांची साफसफाई करण्‍याची जबाबदारी पालीका प्रशासनाची आहे. तसेच ते मुञीघर तात्‍काळ सुरु करावे व त्‍यावर पाण्‍याची टाकी बसवावी अशी मागणी निवेदनातुन करण्‍यात आली आहे. निवेदन देतांना युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वणीः बातमीदार