Home Breaking News दणका…पक्ष विरोधी कृत्य, पक्षश्रेष्ठींनी पाठवली ‘नोटीस’

दणका…पक्ष विरोधी कृत्य, पक्षश्रेष्ठींनी पाठवली ‘नोटीस’

1641

नगर पंचायतीवर सत्ता स्थापनेस आले अपयश

वणी: विधानसभा क्षेत्रातील दोन नगर पंचायतीच्या नुकत्याच निवडणुका झाल्यात. दोन्ही ठिकाणी सर्वाधिक संख्याबळ असताना काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. रणनीती आखताना काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी सपशेल अपयशी ठरल्यामुळे प्रदेशाध्यक्ष कार्यालयाने याचे खापर स्थानिक नेत्यावर फोडले तर पक्ष विरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

वणी विधानसभा मतदार संघातील मरेगाव व झरी जामनी येथील नगर पंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. दोन्ही ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचे संख्याबळ होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने फर्मान जरी केलेले असताना अति महत्वाकांक्षा बाळगल्याने दोन्ही ठिकाणी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले.

मारेगाव व झरी नगर पंचायतीत पक्ष निहाय निवडून आलेल्या सदस्यांची संख्या बघता महाविकास आघाडीचीच सत्ता स्थापन होईल असे दिसत होते. मारेगाव व झरी मध्ये पक्षीय बलाबल लक्षात घेत महाविकास आघाडीची म्हणजेच काँग्रेस व शिवसेनेची सत्ता स्थापन होईल असे सकृतदर्शनी दिसत होते.

नगराध्यक्ष निवडीत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेली गफलत पक्ष्याच्या जिव्हारी लागली आहे. मारेगावात काँग्रेस 5, भाजप 4, शिवसेना 4, मनसे 2, राष्ट्रवादी 1 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल होते. सत्ता स्थापनेच्या वेळी काँग्रेसच्याच अपक्ष बंडखोर उमेदवारला स्थानिक नेत्यांनी उमेदवारी बहाल केली आणि ‘गेम’ फसला.

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणे अभिप्रेत असताना काँग्रेस पक्षाने खेळलेली रणनीती त्यांच्याच अंगलट अली. नगराध्यक्ष निवडीच्या वेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने मारेगावात दोन सदस्यांना मतदानाच्या वेळी गैरहजर ठेवल्याचा गंभीर ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात पुढे काय निष्पन्न होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वणी: बातमीदार