Home Breaking News बँक संचालक येल्टीवार यांना न्यायालयाचा दिलासा

बँक संचालक येल्टीवार यांना न्यायालयाचा दिलासा

1242

विभागीय सहनिबंधक यांच्या आदेशाला स्थगिती

रोखठोक | विभागीय सहनिबंधक यांनी दि. 27 फेब्रुवारी ला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजीव मल्लारेडडी येल्टीवार यांचे बँकेचे संचालक म्हणून राहण्यास अपात्रता धारण केल्याचे स्पष्ट करत आदेश निर्गमित केले होते. त्या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेण्यात आली होती. याप्रकरणी 13 मार्चला सुनावणी असून येल्टीवार यांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

बनावट FDR प्रकरणी विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 अ (ब) नुसार नोटीस बजावली होती. 15 दिवसांचे आत म्हणणे मांडावे असे सुचविण्यात आले होते. राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांना पूर्णसंधी देऊनही त्यांनी कोणतेही म्हणणे मांडलेले नव्हते यामुळे विभागीय सहनिबंधक डी.एम. पालोदकर यांनी 27 फेब्रुवारी ला अपात्रते बाबत आदेश पारित केले होते.

विभागीय सहनिबंधक यांच्या आदेश विरुद्ध बँक संचालक राजीव मल्लारेडडी येल्टीवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर निर्णय देताना न्यायालयाने प्रतिवादीना नोटीस जारी करण्यात येणार असून पुढील सुनावणी 13 मार्च ला ठेवण्यात आली आहे. यामुळे येल्टीवार यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
वणी : बातमीदार