Home वणी परिसर वाढदिवस असाही… तुंबळ गर्दी आणि अमाप प्रेम

वाढदिवस असाही… तुंबळ गर्दी आणि अमाप प्रेम

● फटाक्यांची आतिषबाजी व हजारो कार्यकर्ते

1132

फटाक्यांची आतिषबाजी व हजारो कार्यकर्ते

MNS NEWS WANI | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांचा शनिवारी जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. सकाळपासून शुभाशीर्वाद देणाऱ्यांची वर्दळ निवासस्थानी होती. सायंकाळी 7 वाजता शहरातील टिळक चौकात वाढदिवसाचा अभूतपूर्व ‘नजारा’ बघायला मिळाला. तुंबळ गर्दी आणि अमाप प्रेम, डीजेच्या तालावर बेधुंद नाचणारे कार्यकर्ते वाढदिवस असाही…!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस मोठया उत्साहात आणि जल्लोषात दरवर्षी साजरा करण्यात येतो. दिवसभर विविध कार्यक्रमांनी शहर दणाणून जाते. कार्यकर्त्यांत संचारणारी उर्मी व शेकडो कार्यकर्त्यांचा उत्साह वेगळीच रंगत निर्माण करणारी असते.

सायंकाळी येथील टिळक चौकात कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. फटाक्यांची आतिषबाजी आणि वाद्याचे पडघम कार्यकर्त्यांना थिरकायला लावणारे होते. रात्री दहा वाजता पर्यंत चाललेला जल्लोष आणि कार्यकर्त्यातील उत्साह अवर्णनीय होता.
Rokhthok News