Home क्राईम भीषण अपघातात एक ठार एक जखमी

भीषण अपघातात एक ठार एक जखमी

811

वाहनाच्या चिंधड्या, चालकांचा घटनास्थळीच मृत्यू

वणी बातमीदार: मुकूटबन मार्गावरील साईलीला नगरी जवळ बोलेरो गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. यात घटनास्थळीच चालकांचा मृत्यू झाला तर बाजूला बसलेला युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली.

संकेत गंगाधर सोनपीतरे (30) पुरड ता. वणी येथील निवासी असून त्याचा अपघातात मृत्यू झाला तर बाजूला बसलेला प्रफुल्ल देवदास मोहितकर (23) रा. नेरड ता. वणी हा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री ते दोघे बोलेरो वाहन क्रमांक MH-34-BF-8741 वणी वरून गावी परतत असताना शहरालगतच्या साईलीला नगरी जवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. घटना कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना पाचारण करण्यात आले. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. डॉक्टरांनी संकेत ला मृत घोषित केले तर प्रफुल्ल ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारार्थ चंद्रपूरला हलविण्यात आले. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.