Home Breaking News जीवावर बेतली शेतातील “फवारणी”

जीवावर बेतली शेतातील “फवारणी”

● 23 वर्षीय युवकाचा मृत्यू

3157

23 वर्षीय युवकाचा मृत्यू

Sad News maregaon | तालुक्‍यातील हिवरा (मजरा) या गावात वास्तव्यास असलेल्‍या 23 वर्षीय युवकाला शेतातील फवारणी करतांना विषबाधा झाली. यात त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याची घटना मंगळवार दिनांक 1 ऑगष्‍ट ला सायंकाळी घडली. The youth was poisoned while spraying the field.

सागर सुधाकर राजुरकर (23) असे दुर्देवी मृतकांचे नांव आहे तो हिवरा (मजरा) या गावातील निवासी होता. पिक बहरत असल्‍याने तो त्‍या पिकांना फवारणी करण्‍यासाठी शेतात गेला होता. फवारणी करत असतांना त्‍याला मळमळ व्‍हायला लागली म्‍हणुन त्‍याने घर गाठले.

सागर घरी आला आणि बसलेला असतांनाच त्‍याला भोवळ आली आणि तो खाली कोसळला. घरच्‍या मंडळीनी त्‍याला तातडीने येथील ग्रामीण रुग्‍णांलयात दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासणीअंती त्‍याला मृत घोषीत केले. बुधवारी त्‍याच्‍या मृतदेहांवर उत्‍तरीय तपासणी करुन शव नातेवाईकांना सोपविण्‍यात आले आहे. पुढील तपास मारेगांव पोलीस करताहेत.
Rokhthok News