Home Breaking News बंद घर निशाण्यावर, रोकड व ऐवज लंपास

बंद घर निशाण्यावर, रोकड व ऐवज लंपास

1782

मारोती टॉउनशीप मधील घटना

रोखठोक | काही दिवसांपासून थंडावलेले चोरट्यांचे कृत्य पुन्हा सुरु झाल्याचे दिसत आहे. सोमवार दि. 2 जानेवारीला मध्यरात्री मारोती टाऊनशीप मधील बंद घर फोडले असून रोकड व चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना सकाळी उजागर झाली.

चोरट्यानी मागील दोन महिन्यांपूर्वी चांगलाच धुमाकूळ घातला होता. बंद घरे व दुकाने चोरट्यांचा निशाण्यावर होते, दरदिवशी चोरीच्या घटना घडत होत्या. पोलिसांनी गस्त वाढवल्याने काही प्रमाणात चोरट्यांच्या कृत्यावर लगाम लागला होता.

मारोती टाऊनशीप मध्ये वास्तव्यास असलेले जॉन पोन्नलवर हे आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले होते. सोमवारी रात्री चोरट्यानी घर बंद असल्याचे हेरले आणि कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सामानाची फेकफाक करत 14 ते 15 हजार रुपयांची रोकड व चांदीचे दागिने लंपास केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

घरात चोरी झाल्याची बाब घरमालकाला कळताच त्यांनी घर गाठले. याबाबत पोलिसांना सुचना देण्यात आल्या असून पोलिसांनी घटनास्थळ गाठले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वणी: बातमीदार