Home Breaking News Police News: अनिल बेहराणी वणीचे नवे ठाणेदार

Police News: अनिल बेहराणी वणीचे नवे ठाणेदार

● बुलढाणा येथे होते कार्यरत

2730
C1 20240203 12190235
Img 20240613 Wa0015

बुलढाणा येथे होते कार्यरत

Police News : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विहित निकषानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात असे पोलीस महा संचालक यांना सुचवले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. येथील ठाणेदार अजित जाधव यांची अकोला तर बुलढाणा येथील पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी यांना वणी पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला आहे. Police Inspector Anil Behrani has been given charge of Wani Police Station.

मुळ जिल्हयात कार्यरत असणारे पोलीस अधिकारी तसेच दिनांक 30 जून 2024 पर्यंत जिल्हयात तीन वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण करणारे पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्याचे प्रस्तावित होते. लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उप विभागातील पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात येत आहे.

बुलढाणा पोलीस विभागातील नांदुरा येथे कार्यरत ठाणेदार अनिल बेहराणी यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विहित निकषानुसार अमरावती परिक्षेत्रातील यवतमाळ येथे बदली झाली होती. त्यांचेवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विश्वास दर्शवत Heavy weight ठाण्याचा प्रभार सोपवला आहे.

जिल्ह्यात वणी पोलीस ठाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. येथील प्रभार मिळावा याकरिता अधिकारी आपापल्या पद्धतीने “फिल्डिंग” लावतात. मात्र मागील काही वर्षापासून अधिकाऱ्यांना ठाणेदारपदी अल्पकालावधी मिळाल्याचे दिसून येत आहे. नव्यानेच आलेल्या ठाणेदार अनिल बेहराणी यांना प्रथमतः बिट निहाय माहिती संकलित करून अवैद्यधंद्याचे समूळ उच्चाटन करण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.
Rokhthok News

C1 20240529 15445424