Home Breaking News Shivpuran ‘अराजकीय’ कार्यक्रमाला ‘राजकीय’ रंग…!

Shivpuran ‘अराजकीय’ कार्यक्रमाला ‘राजकीय’ रंग…!

● लोकसहभाग आणि "दाम्पत्य" आयोजक ● शर्मिला राज ठाकरेंची प्रामुख्याने उपस्थिती  

1934
C1 20240203 14121016
लोकसहभाग आणि “दाम्पत्य” आयोजक
शर्मिला राज ठाकरेंची प्रामुख्याने उपस्थिती  

Shivpuran Mahakatha Wani : श्री काशी शिवमहापुराण महाकथेचे आयोजन येथील एका कोळसा व्यावसायिकाने केले होते मात्र यात लोकसहभाग होता. अराजकीय शिवपुराण म्हणून करण्यात आलेली प्रसिद्धी अखेर पूर्णतः राजकीय रंगात न्हाऊन निघाली. महाकथा आणि भविकभक्तांची मांदियाळी अवर्णनीय, अखेरच्या दोन दिवसात भक्तांची प्रचंड रीघ लागली होती. The fact that it was published as an apolitical Shiv Puran has finally become completely political.

भाजपा व अन्य राजकिय पक्षाच्या नेत्यांनी श्री काशी महा शिवपुराणचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजू उंबरकर यांनी पहिल्या दिवसापासून संपूर्ण कार्यक्रम “हायजॅक” केल्याचे वास्तव बघायला मिळाले.

संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांचे श्री काशी महा शिवपुराण हिंदू धर्मीय भाविक भक्तांसाठी आगळी-वेगळी पर्वणीच असते. अध्यात्म आणि भक्तिमार्गाचं विवेचन, सुश्राव्य वाणीतून ऐकतांना भविकभक्त मंत्रमुग्ध होतांना दिसते. मात्र आजूबाजूचा परिसर आणि लगतच्या राज्यातून येणाऱ्या भाविक भक्तांची होणारी गैरसोय किंबहुना परवड अयोजकांची “मग्रुरी” अधोरेखित करते.

श्री काशी शिवमहापुराण महाकथा या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजक दाम्पत्य हे निमित्तमात्र असले तरी लोकसहभागातून झालेला हा भक्तिमार्गाचा कार्यक्रम राजकीय पुढाऱ्यांनीच गाजवला. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

श्री. काशी शिवमहापुराण महाकथेच्या पूर्वसंध्येला पंडित प्रदीप मिश्रा यांची शहरातून शोभायात्रा काढण्याचं आयोजकांनी ठरवलं. तीस ते चाळीस हजार भाविक रॅलीत राहतील असं आयोजकांनी पोलीस प्रशासनाला सांगितलं. परंतु या मिरवणुकीत केवळ दोन ते तीन हजार भाविक असल्याने शहरातील प्रमुख मार्गाने होणारे मार्गक्रमण रद्द करण्यात आले. मात्र मनसे नेते राजू उंबरकर यांनी टिळक चौकात आपलं वर्चस्व दाखवून दिलं आणि अयोजकांची इभ्रत वाचली.

श्री. काशी शिवमहापुराण महाकथेच्या निमित्ताने अनेक राजकीय धुरंधर कथास्थळी आलेत. यात भाजपचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, मनसेच्या शर्मिला राज ठाकरे, पालकमंत्री संजय राठोड, वरोरा-भद्रावती च्या आमदार प्रतिभा सुरेश धानोरकर, सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख व अन्य नेत्यांनी उपस्थिती दर्शवली.

श्री. काशी शिवमहापुराण महाकथेची शुक्रवारी सांगता झाली. आयोजकांनी महाकथेचा कार्यक्रम अराजकीय असल्याचा गवगवा केला होता. अखेर हा सोहळा राजकीय रंगात रंगला. भाजपा व अन्य राजकीय पक्षाने महाकथेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केलेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना अव्वल ठरली. संपूर्ण कार्यक्रम मनसेने “हायजॅक” केल्याचे वास्तव नाकारता येणार नाही.
ROKHTHOK NEWS