Home Breaking News लग्नाचे आमिष आणि वारंवार अत्याचार

लग्नाचे आमिष आणि वारंवार अत्याचार

1188

तक्रारीअंती गुन्हा दाखल, आरोपी गजाआड

वणी: मारेगाव तालुक्यातील एका खेड्यात वास्तव्यास असलेल्या 27 वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून 25 वर्षीय युवतीचे वारंवार लैंगिक शोषण केले. पीडितेने लग्नाचा तगादा लावताच ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत लग्नास नकार देणाऱ्या संशीयता विरुद्ध तक्रारीअंती दि. 2 मार्च ला गुन्हा दाखल करत गजाआड करण्यात आले आहे.

विलास मनोहर रामपुरे (27) असे अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो मारेगाव तालुक्यातील एका खेड्यात वास्तव्यास आहे. त्याच गावातील तरुणी सोबत त्याचे सूत जुळले. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार करण्यात आले.

पीडितेने त्या तरुणाला लग्नाची गळ घातली मात्र तो तरुण ऐकण्याचा मानसिकतेत नव्हता. त्यातच त्याने दुसऱ्या मुली सोबत लग्नाचा घाट रचला आणि साक्षगंध सुद्धा केले.

घडलेल्या या प्रकाराने ती पीडिता कमालीची भेदरली. चार वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केलेल्या तरुणाविरुद्ध रणशिंग फुंकत तडक मरेगाव पोलीस ठाणे गाठले आणि त्या तरुणाविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघता तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला गजाआड केले आहे.
वणी: बातमीदार