Home Breaking News ती …आत्महत्या सासरच्या जाचानेच..!

ती …आत्महत्या सासरच्या जाचानेच..!

2126

पत्नी, सासू व साळा यांचेवर गुन्हा नोंद

रोखठोक | पारिवारिक वादामुळे सासरची मंडळी सातत्याने अवमानित करत होती. हा जाच असह्य झाल्याने 30 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना 20 फेब्रुवारी ला घडली असली तरी तपासाअंती शिरपूर पोलिसांनी शुक्रवार दि. 3 मार्चला पत्नी, सासू व साळा यांचेवर गुन्हा नोंद केला आहे

अमर दिलीप पाटील (30) असे दुर्दैवी मृतक तरुणाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह पुनवट येथे वास्तव्यास होता. 20 फेब्रुवारी ला दुपारी घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली होती.

अमरचा कोरपना तालुक्यातील मुळा, गडचांदूर रोड, येथील तरुणीसोबत विवाह झाला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये खटके उडायला लागले होते. पती-पत्नीच्या वादात सासू लताबाई नरबतराव राऊत, पत्नी व साळ्याने उडी घेतली.

काही दिवसांपूर्वी सासरच्या तिघांनी पुनवट येथे येऊन अमर सोबत चांगलाच वाद घातला होता. यावेळी अमरला चांगलेच अवमानित करण्यात आले होते. झालेला अवमान जिव्हारी लागल्याने अमर याने दुपारी घराच्या छताला गळफास लावून जीवनयात्रा संपवली.

अवघ्या तीस वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनेची विस्तृत माहिती संकलित केली. तक्रारी नंतर सासू, पत्नी व साळा यांचे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वणी : बातमीदार