Home Breaking News वणीत रंगपंचमीला हास्यरंगाची उधळण

वणीत रंगपंचमीला हास्यरंगाची उधळण

417

अति दिड शहाणे समितीचे आयोजन

रोखठोक | मागील 25 वर्षापासुन शहरात धुलीवंदनाच्‍या दिवशी अखील भारतीय हास्‍य कवी संमेलनाचे आयोजन निरंतर करण्‍यात येते. शासकीय मैदानावर दि. 7 मार्च ला नामवंत हास्‍यकलाकार वणीकर नागरीकांना हास्‍यरंगात लोटपोट करण्‍यासाठी सज्‍ज झाले आहे.

रंगपंचमीला सप्‍तरंगाची उधळण झाल्‍या नंतर सायंकाळी हास्‍यरंगाची मैहफील रंगणार आहे. याप्रसंगी हास्‍य सम्राट एहसान कुरेशी, जीवन परविन, रोहीत शर्मा व किरण जोशी हे प्रख्‍यात कवी आपल्‍याला हास्‍यकल्‍लोळात चिंब भिजवणार आहेत.

मागील दोन वर्ष कोरोना कालखंडात हास्‍य कवी संमेलन होवू शकले नाही. सभासदांनी नव्‍या जोमाने यावर्षी संमेलन आयोजित केले आहे. नागरीकांची होणारी गर्दी लक्षात घेता आयोजकांनी परिपुर्ण चोख व्‍यवस्‍था कार्यान्‍वीत केली आहे. उपस्थितांना कोणताही ञास होवू नये याची काळजी आयोजन समिती घेत आहे.

आयोजन समिती मध्ये राजु उंबरकर, अशोक चिंडालीया, दिपक कोकास, राजाभाऊ पाथ्रडकर, राकेश खुराणा, रवि बेलुरकर, राजाभाऊ बिलोरीया, सुनिल जिवने,  सुभाष तिवारी, शेखर शिरभाते, निकेत गुप्ता,  दिपक छाजेड, डॉ. महेंद्र लोढा, बंटी खुराणा,  नितीन शिरभाते, तुषार अतकारे, भिकमचंद गोयनका, रमेश तांबे, रवि साल्‍पेकर हे सदस्य कवि सम्मेलनाच्‍या यशस्वीतेसाठी परिश्रम घेताहेत. तसेच या कार्यक्रमाला जास्ती जास्त श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.
वणी : बातमीदार