Home Breaking News आकाशी झेप घेरे पाखरा….मनसेचे दातृत्व, उपचाराचा संपूर्ण खर्च आणि आस्थेने विचारपूस

आकाशी झेप घेरे पाखरा….मनसेचे दातृत्व, उपचाराचा संपूर्ण खर्च आणि आस्थेने विचारपूस

● सामाजिक बांधिलकी हाच खरा धर्म ● राजू उंबरकर यांचा आशावाद

1117

सामाजिक बांधिलकी हाच खरा धर्म
राजू उंबरकर यांचा आशावाद

रोखठोक | एक आठवड्यापूर्वी शहरातील बँक कॉलोनी परिसरात वास्तव्यास असलेला गरीब होतकरू तरुण पक्षाघाताने ग्रस्त झाला. त्याच्या उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने पारिवारिक मंडळी चिंताग्रस्त झाली होती. काय करावं हेच त्यांना कळत नव्हतं आणि देवदूत धडकला. मनसेचे नेते राजू उंबरकर मदतीला धावून आले.

आकाश च्या उपचारासाठी तात्काळ दोन लाखाची मदत तर केलीच शिवाय उपचाराचा संपूर्ण खर्च देखील करण्याची ग्वाही दिली. उंबरकर यांनी रविवार दि. 2 एप्रिलला नागपूर गाठत ‘आकाश’ची आस्थेने विचारपूस करत सामाजिक बांधिलकी हाच खरा धर्म असल्याचा प्रत्यय आणून दिला.

आकाश च्या प्रकृती बाबत डॉक्टरांशी चर्चा करताना राजू उंबरकर

आकाश विजय बागडे (21) हा होतकरू तरुण छोटे-मोठे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवायचा. त्याचे वडील हमाली तर आई दुस-यांच्या घरी स्वयंपाक करण्याचे काम करतात. परिवाराचा गाडा कसातरी पुढे रेटत असताना अचानक आकाश आजारी पडला. त्याचेवर वणीत उपचार शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्याला नागपूरला हलविण्यास सांगितले.

नागपूर येथील डॉक्टरांनी आकाशच्या उपचारासाठी 3 ते 4 लाखांचा खर्च सांगितला होता. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची, काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते. तरुण लेकराची ही अवस्था माय-बापाला बघवत नव्हती. ही बाब मनसे चे नेते राजू उंबरकर यांना कळली त्यांनी आकाशचे घर गाठले, विस्तृत विचारणा केली. उपचाराची संपूर्ण जबाबदारी घेत सामाजिक बांधिलकी जोपासली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर सातत्याने गरीब, पिडीतांच्या मदतीला धावून जातात. वणी उपविभागातील शेकडो नागरिकांना याचा वेळोवेळी प्रत्यय आलेला आहे. त्यांच्या या व अशा दिलदार कृतीमुळे मतदारसंघात चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
वणी: बातमीदार