Home Breaking News आणि…..उंबरकर यांच्या निवसस्थानासमोर पोलिसांचा ‘बंदोबस्त’

आणि…..उंबरकर यांच्या निवसस्थानासमोर पोलिसांचा ‘बंदोबस्त’

2431

 

मनसेच्या सात पदाधिकाऱ्यांना नोटीस
पोलीस प्रशासन सज्ज

वणी: विदर्भातील मनसेचा गड असलेल्या वणी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यात महाराष्ट्र सैनिक सदैव आक्रमक ‘मोड’ मध्ये असतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळेच राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचेसह सात पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ‘नोटीस’ बजावली असून उंबरकरांच्या निवसस्थानासमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेत त्यांनी भडकाऊ भाषण केल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांना आवाजाची मर्यादा घालून दिली होती, ती मर्यादा त्यांनी ओलांडली. गर्दीचा नियमही त्यांनी मोडला. तसेच पोलिसांनी घालून दिलेल्या 16 अटी पैकी 12 अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस प्रशासन राज ठाकरे यांना केव्हाही अटक करू शकतात यामुळे महाराष्ट्र सैनिकांत अस्वस्थता पसरली आहे. राज्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाला 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिल्याने वातावरण तापलं आहे.

वणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात पदाधिकाऱ्यांना कलम 149 ची नोटीस बजावली आहे. यात राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, माजी नगरसेवक धनंजय त्रिंबके,तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांचेसह अन्य तीन पफधिकाऱ्यांचा समावेश आहे.

वणी शहर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार होऊनये याकरिता पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. ठिकठिकाणी गस्त वाढवण्यात आली असून ठाणेदार रामकृष्ण महल्ले प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. मनसेचे आजी- माजी पदाधिकाऱ्यासह महाराष्ट्र सैनिक कोणता पवित्रा घेणार याकडे प्रशासनाचा कटाक्ष आहे.
वणी: बातमीदार