Home Breaking News अनियंत्रित दुचाकीची ट्रकला धडक, दुचाकीस्वार जखमी

अनियंत्रित दुचाकीची ट्रकला धडक, दुचाकीस्वार जखमी

1791

नांदेपेरा मार्गावर घडली घटना

वणी: तालुक्यातील नांदेपेरा शिवारात रस्त्यावर उभा असलेल्या ट्रक च्या मागील बाजूस भरधाव दुचाकीने धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवार दि. 3 जून ला दुपारी 4 वाजता च्या सुमारास घडली.

अनिल कृष्णाजी लांबट (53) हा दांडगाव ता. मारेगाव येथील निवासी आहे. ते कामानिमित्त वणीला गेले होते, बाजारहाट करून आपली दुचाकी ने गावी परत जात होते. नांदेपेरा शिवारातील पंचमुखी हनुमान मंदिरा जवळ रस्त्याच्या कडेला ट्रक क्रमांक MH- 34-BG 4667 हा उभा होता. भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली आणि ट्रकच्या मागील बाजूस जबर धडक दिली.

घडलेल्या अपघाताबाबत वणी पोलिसांना प्रत्यक्षदर्शींनी सूचना दिली तर जखमीला रुग्णालयात उपचारासाठी हलवले. घडलेली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी वणी पोलीस पुढील तपास करीत आहे.
वणी: बातमीदार