Home Breaking News एकाला लाकडी दांड्याने मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

एकाला लाकडी दांड्याने मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

872
C1 20240404 14205351

पूर्ववैमनस्यातून घडली घटना

वणी: तालुक्यातील पेटूर या गावावरून वणीला परत येत असलेल्या 44 वर्षीय व्यक्तीला दबा धरून बसलेल्या चौघांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. ही घटना मुकुटबन मार्गावरील मानकी गावाजवळ बुधवार दि.1 जून ला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.

सतीश शर्मा (25) रा. सेवानगर, प्रकाश बाबाराव उत्तरवार (25) रा. सेवानगर, रितिका पचारे (25) सर्वोदय चौक, शशांक गुलखने (20) रा. वणी अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. घटनेच्या दिवशी नरेंद्र नारायण चौधरी (44) हे पेटूर वणीकडे परत येत असताना त्यांचेवर चौघांनी हल्ला केला.

यावेळी लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. यात नरेंद्र च्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. घटनास्थळावरून पळ काढत त्याने रुग्णालय गाठले व उपचार केला. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलल्याजात असून याप्रकरणी पोलिसात तक्रारीअंती चौघावर भादंवि कलम 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करित आहे.
वणी: बातमीदार