Home Breaking News विषाचा घोट घेत संपवली ‘जीवनयात्रा’

विषाचा घोट घेत संपवली ‘जीवनयात्रा’

1282
C1 20240404 14205351

बाबापूर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

वणी: तालुक्यातील बाबापूर येथे वास्तव्यास असलेल्या 42 वर्षीय शेतकऱ्यांने विषाचा घोट घेत जीवनयात्रा संपवली. ही घटना रविवार दि. 3 जुलै ला पहाटे उघडकीस आली. त्याला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

विनोद नानाजी खुटेमाटे (42) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह बाबापूर येथे वास्तव्यास होता. त्याचे वडिलांच्या नावे वडिलोपार्जित बाबापूर व चेंडकापूर शिवारात शेती आहे. मृतक हा त्या शेतीची वहिती करून आपल्या संपूर्ण परिवाराचा गाडा हाकायचा.

घटनेच्या दिवशी पहाटे त्याने विषारी द्रव प्राशन केल्याचे पारिवारिक मंडळींना समजले. त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उशीर झाला. त्याचे पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा मोठा परिवार आहे. त्याने घेतलेल्या आत्मघाती निर्णयामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जमीन- जुमला असणाऱ्या शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अस्पष्ट असून आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासात निष्पन्न होईल.
वणी: बातमीदार