Home Breaking News तालुक्यात तरुणांचा काँग्रेस प्रवेशाकडे ‘कल’

तालुक्यात तरुणांचा काँग्रेस प्रवेशाकडे ‘कल’

294

उर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत शेकडोंचा पक्ष प्रवेश

वणी बातमीदार: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता बहुतांश राजकीय पक्ष संघटनात्मक बांधणी करताना दिसत आहे. काँग्रेसने सुद्धा पक्ष बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुक्यातील तरुणांचा काँग्रेस प्रवेशाकडे ‘कल’ असल्याचे प्रकर्षाने जाणवले.

रविवारी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा वणीला नियोजित दौरा होता. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या निवासस्थानी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या प्रसंगी खा. बाळू धानोरकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. मुंगोली चे सरपंच रुपेश ठाकरे, टाकळी चे सरपंच झानेश्वर टोंगे, मारेगाव चे सरपंच राजेन्द्र ठाकरे, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव विधाते, अडेगाव झरीचे सरपंच डॉ. मारोती मासोरकर, भाजपा नगर सेवक संतोष पारखी, बोपापुर  शिवसेना शाखाप्रमुख रवी ढेंगळे, दहेगाव येथील शिवसेनेचे अँड. प्रशांत उपरे, शिरपुरचे डॉ. धिरज डाहुले व टाकळीचे अनिल गुप्ता यांनी आपापल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश केला.

यावेळी खा. बाळु धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा बँक अध्यक्ष टीकाराम कोंगरे, अँड. देविदास काळे, नरेंद्र पाटील ठाकरे, अरुणा खंडाळकर, डॉ. मोरेश्वर पावडे, सुनिल वरारकर, पुरुषोत्तम आवारी, ओम ठाकुर, राजु कासावार, इजहार शेख, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे, मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, महीला तालुका अध्यक्ष संध्या बोबडे, तालुका अध्यक्ष यु. काँ. चे अशोक नागभिडकर, प्रदीप खेकारे, अनंतलाल चौधरी, डेव्हीड पेरकावार यांचेसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठया संख्येने उपस्थित होते.