Home Breaking News Bjp Political News | चंद्रपूर-आर्णी लोकसभेचे विस्तारक “बेलूरकर”

Bjp Political News | चंद्रपूर-आर्णी लोकसभेचे विस्तारक “बेलूरकर”

● पक्षाने सोपवली महत्वाची जबाबदारी

1619
C1 20240404 14205351

पक्षाने सोपवली महत्वाची जबाबदारी

Bjp Political News | संभाव्य सर्वच निवडणुकीत पक्षीय संघटना बांधणी, बूथ रचना आणि कार्यकर्त्यांत समन्वय साधता यावा यासाठी लोकसभा निहाय विस्तारक नेमण्यात आला आहे. चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभेचे विस्तारक म्हणून रवी बेलूरकर यांचेवर पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. Ravi Belurkar has been assigned the responsibility of Chandrapur-Wani-Arni Lok Sabha constituency by the party.

भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून रवी बेलूरकर यांना वणी विधानसभा क्षेत्रात ओळखल्या जाते. संघ परिवारातील असून ते सध्यस्थीतीत जिल्हा सरचिटणीस आहेत. लोकसभा, विधानसभा आणि येणाऱ्या सर्व निवडणुका लक्षात घेता पक्षीय पातळीवरून हालचालीं वाढविण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा क्षेत्रात चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा- भद्रावती, वणी व आर्णी अशा सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत तर दोन मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात असून एका ठिकाणी अपक्ष आमदार आहे.

भारतीय जनता पक्षाने दिनांक 2 ऑक्टोबरला मुंबईत तातडीची बैठक बोलावली होती. याप्रसंगी चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभेच्या विस्तारक पदाची जबाबदारी बेलूरकर यांच्यावर सोपवली आहे. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात बूथरचना, संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांत समन्वय साधावा लागणार आहे.
Rokhthok News