Home वणी परिसर चक्क…शिक्षण विभाग झाला रीकामा

चक्क…शिक्षण विभाग झाला रीकामा

502

केंद्रप्रमुखही संपले

गटसंसाधन केंद्राचा उरला आधार

वणी येथिल शिक्षण विभागात एकमेव शिल्लक असलेल्या केंद्रप्रमुखाकडे गटशिक्षणाधिकाऱ्याचा प्रभार देण्यात आल्याने आता येथिल शिक्षण विभाग पूर्ण रिकामा झाला आहे. गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचारीच केवळ शिक्षण विभागाला आधार बनले आहे.

वणी तालुक्यात दोनशेच्या आसपास शाळा आहेत. या शाळावर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यासाठी गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख अशी यंत्रणा होती. मात्र मात्रील काही वर्षापासून सेवानिवृत्तीचे ग्रहण लागले आणि सर्वअधिकारी सेवानिवृत्त झाले.

काही महिन्यापूर्वी केंद्रप्रमुखाकडे गट शिक्षणाधिकाऱ्या चा प्रभार देण्याची नामुष्की आली होती. आता 31ऑक्टोबर  प्रकाश नागपूरे हे केंद्र प्रमुख (प्रभारी गटशिक्षणाधिकारी) सेवानिवृत्त झाले आणि शेवटचे शिल्लक असलेले केंद्रप्रमुख नवनाथ देवतळे यांच्याकडे गट शिक्षणाधिकाऱ्याचा प्रभार देण्यात आला.

माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी काही शिक्षकांकडे केंद्रप्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर प्रशासकीय कामकाज सांभाळण्यासाठी गट संसाधन केंद्रातील साधन व्यक्ती, विषयतज्ञ, व इतर कर्मचाऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे समग्र शिक्षा अभियान हे निष्प्रभ शिक्षा अभियान ठरले आहे. आता शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याचा मनसुबा आखणाऱ्या शिक्षण प्रणालीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. मरणि शाळांची पटसंख्या घसरणीला लागली असतानाही शासन ‘शिक्षण’ या महत्वाच्या विभागाकडे एवढे दुर्लक्ष का करीत आहे हे न उलगडणारे कोडे आहे.

वणी: बातमीदार