Home Breaking News विषाचा घोट घेवून युवकाने संपवले जीवन

विषाचा घोट घेवून युवकाने संपवले जीवन

1266
C1 20240404 14205351

सुकनेगाव येथील घटना

रोखठोक | तालुक्यातील सुकनेगाव येथे वास्तव्यास असलेल्या 27 वर्षीय युवकाने विषाचा घोट पोटात रिचवत जीवन संपवल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

अनील मारोती अंड्रसकर (27) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह सुकनेगाव येथे वास्तव्यास होता. त्याचे सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. बुधवार दि. 2 नोव्हेंबरला रात्री त्याने विष प्राशन केले.

ही बाब घरच्या मंडळींना कळताच त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला आहे. त्याने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.
वणी: बातमीदार

Previous articleकेशव नागरीची निवडणूक अविरोध
Next articleकाट्याची लढत की सहज सोपा विजय
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.