Home Breaking News Indurikar maharaj : इंदुरीकर महाराज 13 डीसेंबरला वणीत

Indurikar maharaj : इंदुरीकर महाराज 13 डीसेंबरला वणीत

● शासकीय मैदानावर मनोरंजनात्‍मक किर्तन

2889
C1 20231203 18454717

 शासकीय मैदानावर मनोरंजनात्‍मक किर्तन

Wani News | विनोदातून प्रबोधन हा निवृत्‍ती महाराज इंदुरीकर यांच्‍या किर्तनाचा गाभा आहे. मनोरंजनात्‍मक, परखड किर्तनामुळे ते प्रसिध्‍दीच्‍या झोतात आले आहे. त्यांचे धमाल किर्तन 13 डिसेंबरला येथील शासकीय मैदानावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथीदीना निमित्य आयोजीत करण्‍यात आले आहे. Indurikar Maharaj’s kirtan is a subject of curiosity among the people of Warkari in the state.

इंदुरीकर महाराज यांचे किर्तन म्‍हणजे लोटपोट हास्‍यांचे फवारेच असतात. महिलां, विद्यार्थी तर अबाल वृध्‍दांपर्यत किर्तनातुन मारण्‍यात येणारे  प्रबोधनात्‍मक फटकारे त्‍यांच्‍या किर्तनाचे वैशिष्ट्य आहे. गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी आणि रेणुका ईरीगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

इंदुरीकर महाराजाचे किर्तन हा राज्यात वारकरी जनतेचा कुतुहलाचा विषय असतो. त्यांच्या विनोदी, परखडपणा व प्रबोधन पुरक किर्तनाने राज्यातील जनता भारावुन गेली आहे. त्याच्या धमाल किर्तनाची संधी वणीकरांना मिळणार आहे.

मनोरंजनाकडे अधिक झुकणाऱ्या त्यांच्या कीर्तनाला ग्रामीण भागाने पसंती दिली आहे. त्यांचे कीर्तन म्हणजे गर्दी, हे जणू समीकरणच होऊन गेले आहे. वाहिन्या तसेच सोशल मीडियातून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्यांचे वलय वाढत गेले. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांची कीर्तने यू- ट्यूबवर चांगलीच धमाल माजवताहेत.

इंदुरीकर महाराज यांचा कार्यक्रम 3 नोव्‍हेंबरीला आयोजीत करण्‍यात आला होता. माञ मराठा समाज बांधवाच्‍या आंदोलनामुळे त्यावेळी कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. आता 13 डिसेंबर ला सायंकाळी 7 ते 9 या वेळेत हा कार्यक्रम येथील शासकीय मैदान(पाण्याची टाकी) येथे होणार असून नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Rokhthok News