Home Breaking News तिने …शेजाऱ्यांच्या घरात घेतला गळफास

तिने …शेजाऱ्यांच्या घरात घेतला गळफास

● क्षुल्लक कारणावरून उचलले टोकाचे पाऊल

2135
C1 20240204 19203992
क्षुल्लक कारणावरून उचलले टोकाचे पाऊल

Sad News : तालुक्‍यातील कुरई येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या 18 वर्षीय कुमारीकेने क्षुल्‍लक कारणावरुन आत्‍महत्‍ये सारखे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना रविवार दिनांक 4 फेब्रुवारीला दुपारी दिड वाजता उघडकीस आली. The young woman took an extreme step like suicide for a trivial reason.

पायल श्रीराम गेडाम (18) असे मृतक तरुणीचे नांव आहे. ती आपल्‍या परिवारांसह कुरई येथे वास्‍तव्‍यास होती. घटनेच्‍या दिवशी ती आपल्‍या मोबाईल वरुन वार्तालाप करत होती. ही बाब वडीलांना कळली तर ते वेगळाच अर्थ काढतील व रागावतील या क्षुल्‍लक कारणावरुन तीने आपले जीवन संपवले.

घटनेच्‍या दिवशी ती कमालीची अस्‍वस्‍थ होती, वडील रागावणार तर नाही ना या भितीने तीने शेजाऱ्यांचे घर गाठले. तिथे कोणीच नसल्‍याची संधी साधुन तीने गळफास घेतला. ही बाब शेजाऱ्याला कळताच त्‍यांनी तीच्‍या परिवाराला बोलावले तसेच पोलीसांना सुचीत केले. पोलीसांनी घटनास्‍थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्‍तरीय तपासणी करीता पाठवले. याप्रकरणी शिरपुर पोलीस पुढील तपास करीत आहे.
Rokhthok News