Home Breaking News भीषण अपघात, चिमुकली ठार, पाच गंभीर

भीषण अपघात, चिमुकली ठार, पाच गंभीर

1726
Img 20240613 Wa0015

चारचाकी दुभाजकावर आदळली
देवदर्शन करून गावी परतताना घडली घटना

महागाव: माहूरगड येथून देवदर्शन करून गावी परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला सुरक्षित जागा देणाच्या नादात एका कारचा भीषण अपघात झाला. ही घटना महागाव तालुक्यातील खडका उड्डाण पुलाजवळ सोमवार दि. 4 एप्रिल ला सायंकाळी घडली. या अपघातात चिमुकली ठार झाली असून पाच जण गंभीर आहेत.

जालना येथील उज्जैनकर कुटुंब सोमवारी आपल्या स्वतःच्या चारचाकी वाहन क्रमांक MH-11-Y-2337 ने माहूर येथे देवदर्शनाला आले होते. दर्शन आटोपतच ते गावी जाण्यास निघाले. खडका उड्डाण पुलाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला जागा देण्याच्या नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दुभाजकावर आदळले.

या भीषण अपघातात एक वर्षीय चिमुकली ज्ञानेश्वरी चा जागीच मृत्यू झाला तर चंद्रकांत उज्जैनकर (52), भाग्यश्री चंद्रकांत उज्जैनकर (38), आरती उज्जैनकर (42) सुरेखा उज्जैनकर (60) सार्थक उज्जैनकर (06) सर्व राहणार जालना हे गंभीर जखमी झालेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे.

अपघात झाल्यावर बघ्यांची गर्दी झाली, जखमींना रुग्णालयात हलविण्याऐवजी फोटो काढण्यात मग्न असणाऱ्यांना महागाव तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जगदीश नरवाडे यांनी चांगलेच फटकारले. त्यांनी तातडीने जखमींना उपचारार्थ उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात हलवले.
महागाव: बातमीदार

C1 20240529 15445424