Home Breaking News कपडे धुण्यासाठी गेलेल्या बालिकेचा मृत्यू

कपडे धुण्यासाठी गेलेल्या बालिकेचा मृत्यू

● मोहदा गावालगतच्या खदाणीत घडली घटना

1340
C1 20240404 19005262
C1 20240404 14205351

मोहदा गावालगतच्या खदाणीत घडली घटना

Sad News : तालुक्यातील मोहदा या गावात वास्तव्यास असलेली 15 वर्षीय बालिका मैत्रिणीसह खदाणीत साचलेल्या पाण्यात कपडे धुवायला गेली होती. तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली, मैत्रिणीने आरडाओरडा केला मात्र तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दिनांक 4 एप्रिल ला दुपारी घडली. Death of girl who went to wash clothes

विद्या अनील आडे (15) असे मृतक बालिकेचे नाव आहे. ती आपल्या परिवारासह मोहदा येथे वास्तव्यास होती. घटनेच्या दिवशी नेहमी प्रमाणे ती गावा लगत असलेल्या खदाणीत साचलेल्या पाण्यात कपडे धुवायला गेली होती. सोबत तिची मैत्रीण सुद्धा होती, कपडे धूत असताना अचानक पाण्यामध्ये तीचा पाय घसरला
आणि खोल पाण्यात ती बुडायला लागली.

घडलेल्या प्रकारामुळे तिची मैत्रीण कमालीची घाबरली, तिने आरडाओरडा केला. काही नागरिक घटनास्थळी पोहचले. त्याचवेळ विद्याचे वडील सुध्दा तेथे पोहचले. काहींनी पाण्यात उड्या मारल्या परंतु तो पर्यंत विद्या चा पाण्यात बुडुन मृत्यू झाला होता.

याप्रकरणी शिरपूर पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करिता हलविण्यात आला आहे. बालिकेच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
Rokhthok News

Previous articleत्या चार विधानसभा ठरतील “गेम चेंजर”
Next articleदिग्गजांची भेट, नेमकं घडलंय काय..?
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.