Home Breaking News धडाका.. मोमीनपुऱ्यात रॅली आणि कार्यकर्त्यांचा ‘पक्षप्रवेश’

धडाका.. मोमीनपुऱ्यात रॅली आणि कार्यकर्त्यांचा ‘पक्षप्रवेश’

953
C1 20240404 14205351

राजू उंबरकरांचा वाढदिवस थाटात

वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असलेल्या वणी विधानसभा क्षेत्रात दि. 1 जुलैला मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साह व जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला तर येथील मोमीनपुऱ्यात भव्य रॅली काढण्यात आली.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांचा वाढदिवस शहरातील मोमीनपुरा येथे भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. मोमीनपुऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय नेत्याचा वाढदिवस भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

मोहोर्ली, मुकुटबन येथे युवक व नागरिकांनी अभिष्टचिंतन सोहळा आयोजीत केला होता. यावेळी शेकडो युवकांनी उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेत प्रवेश केला तर काही गावातील सरपंचांनी मनसेचे नेतृत्व स्वीकारले. यात सुरेश लांडे, आशिष कांडळकर, राहुल आत्राम यांचा समावेश आहे.

विधानसभा क्षेत्रातील सामान्य नागरिकांना राजू उबरकरांबद्दल जिव्हाळा आणि आपुलकी आहे. आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांनी ख्याती मिळवली आहे. विदर्भात वणी विधानसभा क्षेत्र मनसेचा बालेकिल्ला आहे. सदोदित पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व जनहितार्थ कार्यासाठी सातत्याने ते आपल्या झुंजार कार्यकर्त्यांसह झटत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

महिला जिल्हा अध्यक्ष अर्चना बोदाडकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहकार, मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, झरी तालुकाध्यक्ष गजानन निलमिले, धनंजय त्रिंबके, उमेश वैरागडे, आजिद शेख, इरशाद खान, अनिस सलाट, विकास पवार, प्रवीण डाहुले, गितेश वैद्य, शुभम भोयर, शुभम पिंपळकर, तिन्ही तालुक्यातील शहर अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, मनसे रुग्णसेवा केंद्र व कार्यकर्त्यांनी उंबरकर यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा केला.
वणी: बातमीदार