Home क्राईम बिनधास्त…भर वस्तीत रंगला होता जुगार

बिनधास्त…भर वस्तीत रंगला होता जुगार

1035

11 ताब्यात, 2लाख 74 हजाराचा मुद्देमाल जप्त 

तुषार अतकारे:- शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या सावरकर चौका मधील एका घरात सुरू असलेल्या जुगारावर वणी पोलिसांनी धाड टाकून 11 जणांना ताब्यात घेतले.त्यांच्या जवळून 2 लाख 74 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अकबर हनिफ शेख (43)रा.शास्त्रीनगर, मोसीन राजू शेख (23) रा. एकतानगर, दीपक शंकर गांडलेवार (24) रंगनाथ नगर, नावेद आरिफ शेख (28) रा. वरोरा, राहुल किशोर गावंडे (26) रा. शास्त्रीनगर, शेख गफार शेख सत्तार (34) शास्त्रीनगर, अकरम अकबर बेग (32) रा. शास्त्रीनगर, सादिक शेख हमीद शेख (30) सावरकर चौक, समीर शेख हसन शेख रा.वणी, सुशील मदनकुमार अग्रवाल रा. एकतानगर, मुस्तफा खान मुसा खान (19) रा. वणी असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

सावरकर चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या सादिक शेख याच्या घरात जुगार खेळला जात असल्याची माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना दि. 3 जुलै ला दुपारी 3 वाजताचे सुमारास मिळाली. त्यावरून डीबी पथकाने या घरावर धाड टाकली असता जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आल्याने 11 जणांना ताब्यात घेऊन मोबाईल, नगदी रोकड, दुचाकी वाहन असा एकूण 2 लाख 74 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर यांनी केली.