Home वणी परिसर खड्यातील पाण्यात बुडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

खड्यातील पाण्यात बुडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

140
गोकुळ नगर येथील घटना 

वणी :- शहरातील गोकुल नगर च्या मागील बाजूस असलेल्या खड्यातील पाण्यामध्ये बुडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि 4 सप्टेंबर ला घडली

सिद्धार्थ असे दोन वर्षीय बालकाचे नाव आहे. सुनील पोटे यांचा तो मुलगा आहे. सुनील आपल्या परिवारासह गोकुल नगर येथे  वास्तव्यास आहे. मोल मजुरी करून तो आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करतो. दि 4 सप्टेंबर ला सुनील कामा करीता बाहेर गेला होता तर पत्नी सविता घरातील कामे करीत होती.

पोटे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या जागेवर माती खोदून नेल्याने त्या ठिकाणी मोठं मोठे खड्डे निर्माण झाले आहे. या खड्डामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. सिद्धार्थ हा खेळता खेळता त्या खड्यात पडला. आईला बराच वेळ होऊन ही सिद्धार्थ  दिसत नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला मात्र त्याचा पत्ता लागत नव्हता तो खड्यातील पाण्यात तर पडला नसावा असा अंदाज लावून प्रभारी आरोग्य निरीक्षक भोलेश्वर ताराचंद व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने खड्यातील पाण्यात त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. बालकाचा मृतदेह पाहताच आई वडिलांनी हंबरडा फोडला. बालकाचा दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले.