Home Breaking News वीज पडून 35 वर्षीय तरुण ठार

वीज पडून 35 वर्षीय तरुण ठार

● दहेगाव येथील घटना

5126
C1 20240404 14205351

दहेगाव येथील घटना

Wani News :- तालुक्यातील दहेगाव येथे शेतात काम करीत असलेल्या 35 वर्षीय तरुणाच्या अंगावर वीज पडली. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 4 सप्टेंबरला दुपारी 4 वाजताचे सुमारास घडली. A 35 -year-old man was struck by lightning.

मनोज पांडुरंग गोहोकार (35) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. तो दहेगाव (घोंसा) येथील रहिवासी होता. सोमवारी दुपारी 2 वाजताचे सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली.

अनेक शेतकरी, शेतमजूर हे शेतात काम करीत होते, मनोज देखील आपल्या शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत ते जागीच ठार झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
Rokhthok News