Home Breaking News शिवसेना शिंदेगटाचे हजारो शिवसैनिक मुंबईला रवाना

शिवसेना शिंदेगटाचे हजारो शिवसैनिक मुंबईला रवाना

1069
C1 20240404 14205351

दसरा मेळाव्‍याची जोरदार रणनिती

वणीः वणी विधानसभा क्षेञात शिवसेनेच्‍या शिंदे गटाने चांगलाच माहोल निर्माण केल्‍याचे दिसत आहे. जिल्‍हयाचे नेते मंञी संजय राठोड यांच्‍या मार्गदर्शनाखाली वणी, मारेगाव व झरी तालुक्यातून मुंबई येथे होत असलेल्‍या दसरा मेळाव्‍यासाठी 32 वाहनातुन तब्‍ब्‍ल 1400 शिवसैनिक मंगळवारी सकाळी 11 वाजता रवाना झालेत.

शिवसेनेचे विदर्भातील प्रमुख नेते विद्यमान मंत्री संजय राठोड व खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हापासून ते नव्याने संघटनात्मक बांधणीकरिता सरसावले आहेत. प्रत्येक तालुक्यात जुन्या व नव्या शिवसैनिकांची मोट बांधताना दिसत आहे.

वणी तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर गोरे, माजी पंचायत समिती सदस्य टीकाराम खाडे, सामाजिक कार्यकर्ते मनीष सुरावार, किशोर नांदेकर यांच्या सह अनेक तगडे कार्यकर्ते शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले आहेत.

शिवसेनेचा दसरा मेळावा राज्‍यातील सर्वांनाच सर्वश्रुत आहे. माञ काही महिन्‍यापुर्वी घडलेल्‍या घटनांनी नेमकी खरी शिवसेना कोणती असा संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेला अकल्‍पनिय खिंडार पडले. मात्‍तबर नेते, आमदार व खासदार यांनी उठाव केला. आता शिवसैनिक सुध्‍दा विखुरल्‍या गेले आहेत.

शिवाजी पार्कवर उध्‍दव ठाकरे यांच्‍या शिवसेनेचा तर मुंबईतील बीकेसी मैदानावर मुख्‍यमंञी एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होत आहे. दोन्‍ही मेळावे अभुतपुर्व होतील असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. यामुळे दोन्‍ही गट आम्‍हीच खरी शिवसेना हेच जमलेल्‍या गर्दीच्‍या साक्षीने सिध्‍द करणार आहेत.

वणी विधानसभा मतदार संघातुन सुधाकर गोरे, टीकाराम खाडे, मनीष सुरावार, किशोर नांदेकर यांच्या नेतृत्वात
तब्‍बल 32 ट्रॅव्‍हल्‍स मधुन 1400 शिवसैनीक मुंबई करीता रवाना झाल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांनी दिली. येथून रवाना होण्यापूर्वी शेकडो शिवसैनिकानी अश्‍वारूढ छञपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळयाला व बाळासाहेब ठाकरे यांच्‍या प्रतिमेला हारार्पण केले.
वणी: बातमीदार

Previous articleBreaking …..बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला…!
Next articleभीषण अपघातात दुचाकीस्वार ठार
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.