Home Breaking News Breaking …..बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला…!

Breaking …..बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला…!

4468
Img 20240613 Wa0015

पोलीस घेताहेत घटनेचा शोध

वणी: शिकवणी वर्गाला जात असलेल्या 12 वर्षीय बालकाला चारचाकी वाहनातून आलेल्या दोन अज्ञातांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना मंगळवार दि. 4 ऑक्टोबर ला दुपारी 3 वाजता घडल्याने शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. या घटनेची सत्यता तपसण्याकरिता पोलीस प्रशासन कामाला लागले आहे.

समाज माध्यमातून लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याचे संदेश कमालीचे व्हायरल होतांना दिसत आहे. काही ठिकाणी नागरिकांकडून गैरसमजुतीने अनेकांना चोप दिल्याच्या घटना सुद्धा राज्यात घडल्या. त्यामुळे प्रशासनाने समाज माध्यमावर फिरणारे संदेश बनावट असल्याचे जाहीर केले होते.

मंगळवारी येथील एका प्रथितयश शाळेत इयत्ता 6 वी त शिक्षण घेत असलेल्या 12 वर्षीय बालक दुपारी 3 वाजताच्या सुमारास शिकवणी वर्गात जायला घरून सायकल ने निघाला होता. नांदेपेरा मार्गावरील नगर परिषद शाळा क्रमांक 5 समोर एका चारचाकी वाहनातून दोन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून असलेले खाली उतरले व त्या बालकाला बळजबरीने वाहनात कोंबण्याचा प्रयत्न केल्याचे त्या बालकाचे म्हणणे आहे.

प्रसंगावधान राखून बालकाने कशीबशी आपली सुटका करून तेथून पळ काढला व घर गाठले. बालक प्रचंड घाबरला होता, काही वेळाने घडलेली हकीकत वडिलांना सांगताच त्यांनी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची भेट घेतली. घाबरलेल्या बालकाला उंबरकर व करकर्त्यांनी धीर दिला.

उंबरकर यांनी याबाबत वणी पोलिसांना सतर्क करताच सपोनि माया चाटसे व शेखर वांढरे यांनी घटनास्थळी धाव घेतली व बालकाने सांगितलेल्या घटनेचा परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून सत्यतेची पडताळणी करत आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था ढेपाळली आहे. लोक प्रतिनिधींचा अधिकाऱ्यावर वचक नसल्याने अधिकारी सैराट झाल्याचे दिसत आहे. घडलेली घटना गंभीर स्वरूपाची असून प्रशासनाने तातडीने दखल घेणे गरजेचे झाले आहे.
राजू उंबरकर
राज्य उपाध्यक्ष मनसे

ही बातमी सुध्दा वाचा… खरंच…

https://rokhthok.com/2022/10/04/17606/

https://rokhthok.com/2022/10/04/17623/

https://rokhthok.com/2022/10/04/17629/

C1 20240529 15445424