Home Breaking News ऑटो पलटी, एक ठार, तीन ते चार विद्यार्थी जखमी

ऑटो पलटी, एक ठार, तीन ते चार विद्यार्थी जखमी

● रांगणा- नांदेपेरा मार्गावर घडली घटना

4107

रांगणा- नांदेपेरा मार्गावर घडली घटना

Wani News | प्रवाशी घेऊन वणीकडे जात असलेला भरधाव ऑटो पलटी झाला. या भीषण अपघातात 42 वर्षीय व्यक्ती ठार झाला असून शाळा महाविद्यालयात जात असलेले तीन -चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर ला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली.The speeding auto which was going to Wani with passengers overturned

c1_20231004_09531565

गणपत सातपुते (42) असे मृतकाचे नाव आहे तो सेलू येथील निवासी होता. कामानिमित्त तो वणीला ऑटो क्रमांक MH-V-3781ने जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. ऑटो मध्ये पाच ते सहा प्रवाशी प्रवास करत होते. यामध्ये काही विद्यार्थी सुध्दा होते. ऑटो चालक शंकर पारटकर हा नेहमीप्रमाणे प्रवाशी घेऊन जात होता.

भरधाव ऑटोचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ऑटो पलटी झाला. घडलेल्या घटनेने काहीवेळ चांगलीच तारांबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य आरंभले. पोलिसांना सूचना देण्यात आली व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
Rokhthok News