Home Breaking News आंदोलनात सहभागी चालकाचा आकस्मिक मृत्यू

आंदोलनात सहभागी चालकाचा आकस्मिक मृत्यू

705

एस. टी. कर्मचारी संतप्त

विविध मागण्या साठी एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे.या आंदोलनात सहभागी असलेल्या 52 वर्षीय चालकाचा आज सकाळी मृत्यू झाल्याचे चांगलीच खळबळ उडाली असून उपोषणकर्ते कर्मचारी चांगलेच संतप्त झालेआहे.

वाढीव महागाई भत्त्यांना मान्यता देत कृती समितीने आंदोलन मागे घेतले. मात्र विलीनीकरणच्या मागणीवर ठाम काही कामगार संघटना 1 टक्का घरभाडे वाढ व 28 टक्के महागाई भत्ता देण्याचे राज्य शासनाच्या निर्णयाशी सहमत नाही. वणी एसटी आगार अंतर्गत 245 चालक, वाहक कर्मचारी आहे. त्यातून तब्बल 70 कामगार 30 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून संपावर गेले आहे.

आगाराच्या आवारात उपोषण मंडप उभारून आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनात चालक पदावर कार्यरत असलेले चंदू किसन मडावी हे दि 1व 2 नोव्हेंबर ला आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते घरी गेले होते.

दि 4 नोव्हेंबर सकाळी  त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. मडावी यांच्या मृत्यूने एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला आहे.त्यांचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला याची माहिती कळू शकली नाही.

वणी:बातमीदार