Home Breaking News विदर्भ आयडॉल गीत गायन स्पर्धा

विदर्भ आयडॉल गीत गायन स्पर्धा

842
C1 20240404 14205351

अंजली गायकवाडची विशेष उपस्थिती

रोखठोक |:- श्री रंगनाथस्वामी संगीत कला केंद्र, ईगल सोशल ग्रुप व श्री साई म्युझिकल ग्रुप प्रस्तुत स्व.पंडित रामगोपालजी जोशी स्मृतिप्रीत्यर्थ दि 1 जानेवारीला विदर्भ आयडॉल गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात इंडियन आयडॉल फेम, सारेगमप लिटिल चॅम्पियन अंजली गायकवाड विशेष आकर्षण राहणार आहे.

वणी शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. या शहराने अनेक नामवंत कलाकार घडविले आहे. परिसरात उत्तम गायक देखील आहेत त्यांच्या कलागुणां वाव मिळावा याकरिता सदर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

5 ते 18 वर्ष वयोगट ज्युनिअर गट व 19 ते 50 वर्ष वयोगट सिनियर गट अशा दोन गटात सदर स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. दि 1 जानेवारीला बाजोरिया लॉन मध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.

स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकाची चाचणी घेण्यात येणार आहे. त्याकरिता दि 28 डिसेंबरला टागोर चौकातील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे सकाळी 10 वाजेपासून निवड चाचणी घेण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुक स्पर्धकांनी संतोष जोशी 9370673050, अजित खंदारे 9130175687, दिगंबर ठाकरे 8805925758, यांचेशी सम्पर्क करण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.