Home Breaking News आणि….Sdpo व ठाणेदार शहरातील रस्त्यावर

आणि….Sdpo व ठाणेदार शहरातील रस्त्यावर

● गुन्हेगारी प्रवृत्तीवर ठेवणार वचक

1431
C1 20231204 23124888

गुन्हेगारी प्रवृत्तीवर ठेवणार वचक

Police news wani : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता Sdpo व ठाणेदार चक्क शहरातील रस्त्यावर उतरलेत. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गावरून पायपीट केली. The police administration is ready to maintain law and order in the city.

वणी शहरात सर्वधर्म समभाव जोपासल्या जातो. सर्वधर्मीय नागरिक एकमेकांच्या सन उत्सवात हिरीरीने सहभागी होतात. आज पर्यंत कोणताच अनुचित प्रकार शहरात घडलेला नाही. परंतु एखादा समाजकंटक काही विपरीत विचार करत असेल तर पोलीस प्रशासनाला सजग रहावे लागते.

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अजित जाधव आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री शहरातील मुख्य बाजार पेठेतून मार्च काढला. लोकमान्य टिळक चौकातून गांधी चौक ते गाडगेबाबा चौका पर्यंत पायपीट केली. बाजारपेठेत कोणताही आक्रस्ताळेपणा होऊ नये याची खबरदारी घेतली.

पोलिसांनी शहरातील गस्त वाढवली आहे. रात्रीच्या सुमारास संपूर्ण रुलर एरियात पोलिसांचा जागता पहारा आहे. डीबी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. समाजकंटक व समाजविघातक कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पोलिसांनी पोलिसिंग सुरू केल्यामुळे गुन्हेगारीवर बराच आळा बसला आहे.
Rokhthok News