Home Breaking News बायपास वर भीषण अपघात, महिला ठार

बायपास वर भीषण अपघात, महिला ठार

● वडगाव फाट्या जवळची घटना

7734
C1 20240105 12174534

वडगाव फाट्या जवळची घटना

Accident News : एक दाम्पत्य दुचाकीने जात असताना भरधाव ट्रकने जबर धडक दिली. यात 60 वर्षीय महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही भीषण घटना शुक्रवारी सकाळी वडगाव फाट्याजवळ बायपासवर  घडली. A 60-year-old woman died on the spot.

छबुताई भोंगळे (60) असे मृतक महिलेचे नाव आहे. ती पती उत्तम भोंगळे यांचे सोबत दुचाकीने जात होती त्याच वेळी भरधाव असलेल्या ट्रक ने दुचाकीला उडवले. यात महिलेच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

अपघाताची घटना घडताच बघ्यांची गर्दी जमली. पोलिसांना कळविण्यात आले, पोलिसांनी पंचनामा केला. व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News