Home Breaking News त्या…वानराच्या जखमी पिल्लाला दिले ‘जीवदान’

त्या…वानराच्या जखमी पिल्लाला दिले ‘जीवदान’

वानराचे पिल्लू कळपातुन भरकटले ते त्याच परिसरात भटकत होते मात्र मोकाट कुत्र्यांनी त्या पिल्लावर.....

680
C1 20240404 14205351

मोकाट कुत्र्यांनी चढवला होता हल्ला

रोखठोक | विद्यानगरी परिसरात मागील एक महिन्यापासून वानराचे पिल्लू कळपातुन भरकटले. ते त्याच परिसरात भटकत होते मात्र मोकाट कुत्र्यांनी त्या पिल्लावर हल्ला चढवला. यात ते पिल्लू गंभीर जखमी झाले. ही बाब निलेश चौधरी यांना समजताच त्यांनी प्राणी मित्राच्या मदतीने वानराच्या जखमी पिल्लाला जीवदान दिले. The baby monkey strayed from the herd. They were wandering in the same area but the loose dogs attacked the puppy.

वानराचे कळप पाण्यासाठी जंगलातून शहराच्या दिशेने येताहेत. असेच एका कळपातून लहानगे पिल्लू भरकटले. विद्यानगरी परिसरात या घरावरून त्या घरावर हुंदडत असल्याने बाळ गोपाळाना त्याचा लळा लागला होता. मंगळवारी सायंकाळी मोकाट कुत्र्यांनी त्या वानराच्या पिल्लावर हल्ला चढवला.

घडलेल्या या प्रकाराची माहिती निलेश चौधरी व स्थानिक तरुणांना कळली. त्यांनी तातडीने वानराच्या पिल्लावर उपचार करण्याचा निर्णय घेतला. शहरातील प्राणिमित्र हरीश कापसे यांना पाचारण करण्यात आले तर वन विभागाला सूचना देण्यात आली.

चार तासाच्या परिश्रमातून गंभीर जखमी असलेल्या वानराच्या पिल्लाला ताब्यात घेण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या पिल्लाला वन विभाग व प्राणीमित्र हरीश कापसे यांनी उपचारार्थ रुग्णालयात हलवले. या प्रसंगी विद्यानगरी येथील अशोक चौधरी, मनोज नवघरे, विनोद आवरी, विलास समर्थ, अशोक चव्हाण, धनराज डवरे यांचे सहकार्य लाभले.
वणी: बातमीदार

Previous articleMahavir Jayanti.. वणीत भव्य शोभायात्रा
Next articleत्याने …गळफास लावला, कारण अस्पष्ट
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.